किनगावातील 19 वर्षीय तरुणी बेपत्ता
भुसावळ : यावल तालुक्यातील किनगाव येथील मूळ रहिवासी व हल्ली भुसावळातील सदगुरू पेट्रोल पंपामगील वीटभट्टास्थित रहिवासी जयश्री (छकुली) पुंडलिक कोळी (19) ही 3 फेब्रुवारीपासून घरात कुणाला काही एक न सांगता बेपाा झाली आहे. याबाबत तालुका पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. तरुणी शरीराने सडपातळ, रंग काळा-सावळा, उंची पाच फूट, चेहरा लांबट, नाक सरळ, केस लांब, अंगात काळ्या रंगाचा टॉप व क्रिम रंगाची सलवार तसेच डोक्यावर मध्यभागी गोंदलेले आहे. सदर तरुणीबाबत कुणाला काही माहिती असल्यास भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल विजय पोहेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.
