मुक्ताईनगरात धाडसी घरफोडी : 51 हजारांचा मुद्देमाल लंपास


Daring house burglary in Muktainagar : 51,000 worth of property looted मुक्ताईनगर : घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी 51 हजारांचा ऐवज लांबवला. ही घरफोडी शहरातील शिव कॉलनीत 10 ते 13 डिसेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
कैलास राजाराम दाणी (64, मुक्ताईनगर) हे तापी पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी असून कुटूंबासह शिव कॉलनीत वास्तव्यास आहेत. दाणी कुटूंब 10 ते 13 दरम्यान जळगाव येथे गेल्यानंतर घर बंद होते व ही संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी दहा हजार रुपये किंमतीची चांदीची नाणे, 29 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, 12 हजारांची रोकड असा एकूण 51 हजारांचा ऐवज लांबवला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !