साकळीत 15 रोजी गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त कार्यक्रम


यावल : तालुक्यातील साकळी येथील मनवेल रस्त्यावरील हतनुर पाटचारीजवळील जोशी फार्म येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज फाउंडेशन साकळीतर्फे गजानन महाराज प्रकटदिन उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान सकाळी 11.30 वाजता जितेंद्र नेवे (छोटू बाबा) यांच्या हस्ते महाराजांचा अभिषेक व महाआरती केली जाणार आहे. यानंतर दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जोशी फार्म येथील सदर प्रकट दिन सोहळ्याचे हे नववे वर्ष असून सदर सोहळ्यास गाव व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्री संत गजानन महाराज फाउंडेशन साकळी तर्फे वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रम व साकळी ते शेगाव पायी दिंडी सोहळा आयोजित केला जात असतो. शनिवारी होणार्‍या प्रकट दिनाच्या महाप्रसादाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !