18 किलोमीटर धावत साजरा केला वर्धापनदिन

भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा वर्धापनदिन सर्व धावपटूंनी मोठ्या उत्साहात साजरा केला. 150 हून अधिक धावपटून यावेळी 18 किलोमीटर अंतर धावून पूर्ण केले.

एकत्र धावून पूर्ण केले अंतर
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, डॉ.वर्षा वाडिले, डॉ.स्वाती फालक, एकता भगत, किर्ती मोटाळकर, संगीता चौधरी, दीपा स्वामी, सरला पाटील, माधुरी चौधरी या महिला धावपटूंसोबत सुरेश सहानी, विलास पाटील, जितेंद्र चौधरी, ताराचंद खरारे, प्रशांत वंजारी, गनसिंग पाटील, मंगेश चंदन, राजेंद्र ठाकूर, संतोष मोटवानी, सारंग चौधरी, महेंद्र पाटील व प्रवीण पाटील या धावपटूंनी सुरुवातीस वॉर्मअप करून धावायला सुरुवात केली. या रनचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पुरुष व महिला धावपटूंनी एकत्र सारख्या वेगात धावायचे नियोजन केले होते व ठरल्याप्रमाणे सर्वांनी सोबत 18 किमी अंतर सहजरीत्या पूर्ण केले. दीपनगरच्या पुढे जाऊन तिथून पुन्हा वळसा घेऊन धावपटू पुन्हा त्याच मार्गाने क्रीडांगणावर परतले.


विविध कार्यक्रमांनी वर्धापनदिन उत्साहात
रनसाठी संघटनेचे प्रमुख प्रा.प्रवीण फालक यांनी धावपटूंसाठी पेयजल व खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यासोबतच ठिकठिकाणी त्यांना मार्गदर्शन देखील केले. त्यानंतर संध्याकाळी चार ते सहा या वेळेत विविध कार्यक्रमांद्वारे सर्व धावपटू व सायकलपटूंनी सहपरिवार वर्धापनदिन साजरा केला. याप्रसंगी सुनीता सिंग, सविता घाटे, सीमा बापारी, सीमा वायकर, प्रीती पांडा व पारुल वर्मा यांनी नृत्याविष्कार सादर केला. डॉ.नीलिमा नेहेते व रमेशसिंग पाटील यांनी गीतगायन केले. यावेळी दीपा स्वामी, प्रदीप माळी ,अ‍ॅड मोहन देशपांडे, सारंग चौधरी, रीना परदेशी या धावपटूंनी आपले मनोगत व्यक्त केले. विश्वस्तांच्या वतीने ब्रिजेश लाहोटी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रवीण फालक, डॉ. नीलिमा नेहेते, प्रवीण पाटील, ब्रिजेश लाहोटी, प्रवीण वारके, रणजीत खरारे, डॉ.चारुलता पाटील, पूनम भंगळे, डॉ.तुषार पाटील या विश्वस्तांच्या वतीने उपस्थित धावपटू व सायकलपटूंना अभिवादन करण्यात आले. यावेळी शरीर सुदृढता संदेश देण्यासाठी केक न कापता पपई कापण्यात आली. कार्यक्रमासाठी भेल इंडियाचे व्यवस्थापक दिनेश जावळे व रेल्वेचे अधिकारी विवियन रॉड्रिक्स यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा.प्रवीण फालक होते. आभार डॉ.नीलिमा नेहेते नेते यांनी मानले. यशस्वितेसाठी उमेश घुले, छोटू गवळी यांचे सहकार्य लाभले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !