भुसावळात लिकेज पाईप लाईनीची दुरुस्ती : 22 हजार नळांना पाणीपुरवठा ठप्प
Repair of leakage pipe line in Bhusawal : Water supply to 22 thousand taps stopped भुसावळ : भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीजवळील नाहाटा जलकुंभाला जोडली जाणारी पाईप लिकेज झाल्याने दररोज 50 हजार लिटर पाण्याच्या अपव्यय होत होता शिवाय त्यामुळे जामनेर रोडवरील पाणीपुरवठ्यावर परीणाम होत असल्याने पालिकेने गुरुवारपासून लिकेज पाईप लाईन दुरुस्तीच्या कामाला वेग दिला आहे. परीणामी भुसावळकडून मुक्ताईनगरकडे उड्डानपूलाजवळून डाव्या हाताने वळणार्या गाड्या आता पुलाखालून पलिकडे जात आहेत. दरम्यान, अद्याप लिकेज सापडला नसल्याने या परीसरातील 22 हजार नळांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
जीर्ण पाईप लाईनची शहरवासीयांना डोकेदुखी
पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख व त्याच्या पथकाकडून पाईप लाईन तपासणी करण्यात येत आहे. शहरात वारंवार होणार्या लिकेज पाईप लाईनीमुळे शहरातील पाणीपुरवठा हा अनियमीत होत असल्याने नागरीक वैतागले आहेत. जीर्ण पाईप लाईन फुटल्याने दररोज सुमारे 50 हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरीकांमधूनही नाराजी व्यक्त होत होती शिवाय जलकुंभ भरण्यास दिरंगाई होत होती.


दोन दिवस पाणी नाही
नाहाटा चौफुलीजवळ सुरू करण्यात आलेल्या लिकेजच्या कामामुळे सिंधी कॉलनी व परीरसरात होणारा पाणीपुरवठा तसेच खडकारोडवरील जलकुंभावरून ज्या भागात पाणीपुरवठा होतो त्या भागातील पाणीपुरवठा दोन दिवस आता पुढे ढकलला गेला आहे. दरम्यान, दुरुस्तीच्या ठिकाणी महामार्ग प्राधीकरण विभागाचे पथक पाणीपुरवठा विभााच्या मदतीला धावून आले आहे. लिकेज सापडल्यानंतर त्याची दुरुस्ती होईल व त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सूत्रांनी सांगितले.
