भाजप भुसावळ शहर कार्यकारीणी जाहिर
भुसावळ : भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी शनिवारी जाहिर केली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर झालेल्या या कार्यकारिणीत तीन सरचिटणीस, सात उपाध्यक्ष, सात चिटणीस व एक कोषाध्यक्ष आदी पदांचा समावेश करण्यात आला आहे.
अशी शहर कार्यकारिणी अशी
सरचिटणीसपदी रमाशंकर दुबे, श्रेयस इंगळे, संदीप सुरवाडे, उपाध्यक्षपदी शैलजा नारखेडे, रवी ढगे, प्रशांत देवकर, पवन बुंदेले, चेतन बोरोले, प्रा.प्रशांत पाटील, प्रमोद नेमाडे, यांची तर चिटणीसपदी प्रसन्न पांडे, जयंत माहूरकर, विजय बठेजा, प्रितमा महाजन, बिसन गोहर, मेघा वाणी, अमोल पाटील व कोषाध्यक्षपदी नारायण रणधीर यांची निवड शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी जाहिर केली आहे. या निवडीबद्दल नवनियुक्त पदाधिकार्यांचे भाजपच्या नेत्यांनी स्वागत केले आहे.







