खासदार निलंबन : वरणगावात राष्ट्रवादीतर्फे निषेध
वरणगाव : वरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार निलंबनावरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते वाय.आर.पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. देशात लोकशाही राहील की नाही अशी यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली. अशा हुकूमशाहीला जर थांबवायचे असेल तर आपल्याला 2024 ला मोदी सरकारला पायउतार करावे लागेल अशा हुकूमशाही पद्धतीचा आम्ही निषेध करतो अशा शब्दांमध्ये केंद्र सरकारवर टीका केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते वाय.आर.पाटील, राजेंद्र चौधरी, दीपक मराठे, महेश सोनवणे, पप्पू जकातदार, नागो पाटील, डेबा पाटील, शांताराम सुरळकर, दिलीप गायकवाड, उल्हास पाटील, राजेश चौधरी, इफ्तेखार मिर्जा, राजेश इंगळे, नरेंद्र इंगळे, सोहिल कुरेश, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, प्रतिभा तावडे, रोहिणी सुधाकर जावळे, रंजना रवींद्र पाटील, श्रद्धा दिलीप गायकवाड, असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.







