ललवानी फाउंडेशनतर्फे स्व.स्वप्निल ललवाणीचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रमाने साजरा


भुसावळ : ललवानी फाउंडेशनतर्फे श्रीमती प.क. कोटचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांचा कनिष्ठ सुपुत्र स्वर्गीय स्वप्निल ललवाणी याचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. स्व.स्वप्नीलच्या स्मृतींना उजाळा मिळण्यासाठी वराडसीम येथील जिल्हा परीषद मराठी मुलींची शाळे विद्यार्थिनींना वह्या, पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ व मिठाई वाटप करण्यात आली तसेच शाळेला फाईली व खेळण्याचे साहित्य देण्यात आले.

गोकुलग्राम व अनुसंधान केंद्राची निर्मिती
मुख्याध्यापिका पौर्णिमा फेगडे यांनी प्रास्ताविकात ललवाणी परिवाराच्या योगदानाबद्दल माहिती दिली. ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ललवानी फाउंडेशनतर्फे प्रा.डॉ.डी.एम.ललवानी यांनी स्व.स्वप्नीलच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. स्वर्गीय स्वप्निलच्या आठवणी चिरकाल टिकून राहण्यासाठी स्व.स्वप्निल स्मृती गोकुलग्राम व अनुसंधान केंद्राची निर्मिती सुरू असल्याचे ते म्हणाले. शिक्षक राजेंद्र सुरवाडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी मदनलाल ललवाणी, शोभा ललवाणी, ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उपसरपंच विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य धीरज पाटील, समाजसेवक दीपक झारखंडे, पालक बाळू सपकाळे, पत्रकार बापू सोनवणे, भरत कोळी, मुख्याध्यापिका पौर्णिमा फेगडे, शिक्षक राजेंद्र सुरवाडे, कविता भोळे, गोकुर्णाबाई मेढे व विशेष म्हणजे सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !