रस्ता चौपदरीकरणात डावलले : रावेरला 29 रोजी रास्ता रोको

अंकलेश्वर-बर्‍हाणपूर रस्ता चौपदरीकरणासाठी नागरीक एकवटले


Road Four-Fourning : Block road on Raver 29 रावेर : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्ग चौपदरीकरणात रावेर व सावदा या शहरांना वगळल्याच्या निषेधार्थ रावेर येथे 29 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याच्या इशारा रावेर तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, शेतकरी, व्यापारी यांनी दिला आहे. अंकलेश्वर-बर्‍हाणपूर रस्ता चौपदरीकरणात रावेरसह सावदा शहराला डावलण्यात आल्याने जनभावना संतप्त आहेत. या पार्श्वभूमीवर रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी, व्यापारी व कार्यकर्त्यांची बैठक आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नुकतीच झाली.

29 रोजी होणार रास्ता रोको
पूर्वीपासून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्ग क्रमांक चार असे नाव वापरात आहे. हा रस्ता फैजपूर-सावदा-रावेर ते चोरवड पुढे बर्‍हाणपूरला जातो तसेच रावेर, सावदा व फैजपूर परिसर व या शहरातील सर्व शेतकरी, व्यापारी केळी वाहतुकीसाठी या मार्गाचा उपयोग करतात. या दोन्ही शहरांना दळणवळण सुविधेपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रावेर शहराला डावलून चौपदरी रस्त्याचे भूसंपादन वेगळ्या दिशेने करणे चुकीचे आहे. अंकलेश्वर-बर्‍हाणपूर रस्त्याचे चौपदरीकरण रावेर व सावदा या शहरातून किंवा शहराला लागून करावा या मागणीसाठी रावेर येथे शुक्रवार, 29 रोजी रावेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे बैठकीत एकमताने ठरले .


यांची होती उपस्थिती
बैठकीनंतर तहसील कार्यालयात जाऊन निवासी नायब तहसीलदार तहसीलदार संजय तायडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, कृउबा सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील संचालक योगीराज पाटील, गणेश महाजन, जयेश कुयटे, रावेर पीपुल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील, सुनील कोंडे, विशाल अग्रवाल, घनश्याम पाटील गणेश चौधरी, घनश्याम पाटील, प्रशांत पाटील, अमोल महाजन, गणेश चौधरी, प्रणित महाजन, डी.डी.वाणी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !