यावलला दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप
Distribution of Prosthetic Limbs and Assistive Devices to Yavala differently abled brothers यावल : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्याद्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांच्यामार्फत यावल येथे दिव्यांग बांधवांसाठी खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांना ‘कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने’ वाटप करण्यात आली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, हिरालाल चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास पाटील, उज्जैनसिंग राजपूत, बाजार समिती सभापती हर्षल पाटील, डॉ.कुंदन फेगडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, अपंग आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण पाटील, शहराध्यक्ष निलेश गडे, हेमराज फेगडे, छोटू पाटील, डॉ.नरेंद्र कोल्हे, किशोर कुलकर्णी, योगेश चौधरी, अंकुश चाधरी, भाजयुमो तालुकाध्यक्ष सागर कोळी, विक्रम वरकड, भूषण फेगडे, भाजयुमो शहराध्यक्ष रीतेश बारी, राम आहुजा, उमेश पाटील, राहुल बारी, देविदास नाना पाटील, व्यंकटेश बारी, महिला आघाडी शहराध्यक्ष सरला कवडीवाले, कोमल इंगळे, नरेंद्र चौधरी, राहुल पाटील, योगराज बर्हाटे, अभय रावते, आकाश कोळी आदी उपस्थित होते.


