यावलला श्री महर्षी व्यास मंदिरात विष्णू महापुराण कथेनिमित्त दिंडी सोहळा


यावल : यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात विष्णू महापुराण कथा आयोजित करण्यात आली. या कथेच्या सांगतेनिमित्त शहरातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. मोठ्या संख्येत आबालवृध्द महिला व पुरूष भाविक, भक्त सहभागी झाले. शहरातून काढण्यात आलेली की दिंडी लक्षवेधी ठरली.

भजनी महिला मंडळांचा सहभाग
श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदिरात गेल्या शनिवार, 16 डिसेंबरपासून संगीतमय श्री विष्णू पुराण कथा प.पू.माँ ममता दीदी यांच्या सुमधूर वाणीत सुरू होती. या कथेची सांगता मोठ्या उत्साहात झाली व या निमित्ताने शनिवारी श्री महर्षी व्यास महाराजांचा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मिरवणूकीची सुरूवात मंदिरापासून करण्यात आली. रस्त्याने भाविकांनी रंगीबेरंगी रांगोळया काढल्या होत्या व दिडींचे सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रथम कलश प्रतिमेचा रथ होता. नंतर कलश घेऊन महिलांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात महिलांनी भक्ती गीत गायलीत. महिला भजनी मंडळात यावल तसेच राजोरा येथील महिलांनी एका सुरात भजने म्हणत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विविध प्रकारची भजने सादर केली तसेच पुरूष भजनी मंडळाने सुध्दा निरनिराळे भक्तीगीत सादर केले. यात विजय महाराज (टाकरखेडा) यांच्यासोबत टाळकरी यांनी भक्तीगीत म्हणत साथ दिली.


बोरावल, टाकरखेडा, विरावल येथील टाळकरी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी सजविलेल्या पालखीमधे श्री महर्षी व्यासांच्या पादुका व फोटो ठेवण्यात आला होता. भाविकांनी श्री महर्षी व्यासांचे दर्शन घेण्यासाठी दुतर्फा गर्दी केली होती. भाविकांना खडीसाखर प्रसाद म्हणून वाटण्यात आली. मिरवणूक व्यास मंदिरापासून रेणुका देवी मंदिर, मेनरोडाने चावडीवरून बारी वाडा, महाजन गल्ली, वाचनालयामार्गे देशमुख वाडा, महादेव मंदिरापर्यंत काढल्यात आली. या मिरवणुकीमध्ये श्री महर्षी व्यास मंदिर संचालक मंडळ तसेच शहरातील इतर भाविक-भक्त मोठ्या संख्येत सहभागी झाले. या दिंडीचा समारोप शहरातील श्री महादेव मंदिर या ठिकाणी करण्यात आला. सोहळ्याचा समारोप रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत काल्याच्या कीर्तनाने झाला व नंतर 12 वाजेपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !