गुन्ह्यांच्या निर्गतीसह उत्कृष्ट कार्य करणार्‍या भुसावळातील खाकीच्या शिलेदारांचा सन्मान


भुसावळ : मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार अधिकाधिक केसेससह गुन्ह्यांची निर्गती तसेच वरीष्ठ व स्थानिक अर्जांची निर्गती करणार्‍या पाच पोलिस कर्मचार्‍यांचा ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानार्थी कर्मचार्‍यांमध्ये भुसावळ शहरचे कॉन्स्टेबल मो.जुबेर हारून शेख, बाजारपेठचे हवालदार संदीप परदेशी, भुसावळ तालुक्याच्या महिला हवालदार प्राची जोशी, नशिराबादचे कॉन्स्टेबल तौसीफ खान अयूब खान, शहर वाहतूक शाखेचे हवालदार अरुण पाटील यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट कार्याची दखल
भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी उत्कृष्ट काम करणार्‍या विभागातील पाच कर्मचार्‍यांची दर महिन्याला निवड करीत त्यांना ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्कार देण्याची संकल्पना राबवली असून या उपक्रमामुळे कर्मचार्‍यांमध्ये काम करण्याचा हुरूप वाढला आहे. कार्यक्रमप्रसंगी बाजारपेठचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, भुसावळ विभागातील दुय्यम अधिकारी व 50 कर्मचारी उपस्थित होते.


‘खाकी’च्या गौरवाने कामाला गती
पकर्मचार्‍यांचा पुरस्काराने गौरव केल्यानंतर एक महिनाभर या गौरवाचा भला मोठा फोटो त्या-त्या पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात झळकवला जातो त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍यांच्या नजरेत कर्मचार्‍यांचे कार्य भावते व कर्मचार्‍याला पुन्हा चांगले काम करण्याचा हुरूप वाढतो शिवाय एक हजारांचा रीवॉर्ड व वरीष्ठांच्या शाबासकीसह प्रशस्तीपत्र मिळाल्याने कामाबाबत स्पर्धाही वाढते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !