अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्गाचे चौपदरीकरण रावेरमार्गेच होणार : खासदार रक्षा खडसे
Ankleshwar-Berhanpur highway will be four-lane through Raver only : MP Raksha Khadse रावेर : तीन राज्यांना जोडणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग रावेरमार्गे होईल, अशी ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी रावेरातील पत्रकार परिषदेत दिली. दिल्ली येथे महामार्ग मंत्री नितीन गडकरींसोबत रक्षा खडसे यांनी भेट घेतली आणि त्यांना अंकलेश्वर-बर्हाणपूर रावेरमार्गे करावा अशी मागणी करण्यात आल्याचे खासदार म्हणाल्या.
मंत्री नितीन गडकरींसोबत चर्चा
रावेरच्या विकासासाठी ही बाब आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. गडकरी यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार रक्षा खडसे यांची 5 जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाचे भोपाल, नागपूर रीजनल अधिकारी, स्थानिक महामार्ग अधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सोबत बैठक होणार आहे. त्यात चर्चा करण्यात येवून हा रस्ता रावेर मार्गेच होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती खासदारांनी रावेरात भारतीय जनता पक्षाच्या आयोजित केलेल्या पत्रकार दिली.


दोन्ही शहरांना मिळणार दळण-वळण सुविधेचा लाभ
पूर्वीपासून अंकलेश्वर-बर्हाणपूर मार्ग रावेरहून असल्याने हा रस्ता फैजपूर-सावदा-रावेर ते चोरवड पुढे बर्हाणपूरला जातो. रावेर, सावदा या शहरातील सर्व शेतकरी, व्यापारी केळी वाहतुकीसाठी या मार्गाचा उपयोग करतात. या दोन्ही शहरांना दळणवळण सुविधेचा लाभ मिळेल, असेही खासदारांनी सांगितले. यावेळी किसान मोर्चाचे सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, राजन लासुरकर, सुनील पाटील, सी.एस.पाटील, उमेश महाजन, शुभम पाटील, वासुदेव नरवाडे, अरुण शिंदे, चेतन पाटील, लखन महाजन आदींची उपस्थिती होती.





