जळगावात एअरगनसह दोन तोतया पोलिस जाळ्यात


जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी एअरगनसह दोघा तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पवन रमेश काळे, (23, रा.तरसोद ता.जि.जळगाव) व रवींद्र भागवत चौधरी, (23, रा. भादली ता.जि. जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावेत आहेत. दोघे संशयित मेहरुण तलाव चौपाटी परीसरात रायसोनी फॉर्म हाऊसजवळील चौपाटीवर सायंकाळी एका इसमास थांबवुन विचारपूस करीत होते शिवाय दोघांकडे पोलिस विभागाची फायबर काठी आणि एकाकडे एअरगन आढळली.

एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्य
तोतया पोलिसांनी चौपाटीवर बसलेला गौरव राजेंद्र पवार (रा. चंदु अण्णा नगर, जळगाव) याला पोलिसीगिरी दाखविण्याचा प्रयत्न केला असता गौरव पवारने ‘तुम्ही पोलीस असल्याचा पुरावा दाखवा’ असे सांगितल्यानंतर त्यांनी ओळखपत्र नसल्याचे सांगितले. यावरून एमआयडीसी पोलीसांनी पवन काळे आणि रविंद्र चौधरी यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात पोलीस विभागाच्या फायबरची काठी, पोलिस शिटी, स्पोर्टस् हंक्स मोटारसायकल आणि एक विनापरवाना एअरगन आढळून आली. दरम्यान दोघांना ताब्यात घेतले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रणजित शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पो.हे.कॉ. जितेंद्र राजपुत, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, पोका. सचिन चौधरी यांनी कारवाई केली. सचिन चौधरी यांनी विशेष कामगिरी केले असून त्यांच्याच फिर्यादीवरून दोघा तोतया पोलीसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !