भुसावळात दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवासह सहाय्यभूत साधनांचे वाटप

खासदारांच्या प्रयत्नांनी शिबिर : दिव्यांग बांधवांच्या गोटातून समाधान


Distribution of assistive devices including prostheses to disabled brothers in Bhusawal भुसावळ : भुसावळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी दुपारी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूरमार्फत भुसावळ येथे दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरासाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदारांच्या प्रयत्नाने शहरात हे शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पूर्व तपासणी व नोंदणी झालेल्यांना मिळाला लाभ
काही महिन्यांपूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या भुसावळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना गुरुवारी ट्रामा केअर व ग्रामीण रुग्णालयात आयोजित शिबिरात कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात आले.


यांची शिबिराला उपस्थिती
शिबिराला भुसावळ विधानसभा निवडणूक प्रमुख संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सतीष सपकाळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, नरेंद्र बर्‍हाटे, पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद सावकारे, डॉ.आसीफ शेख, डॉ.विजय कुरकुरे, मुरलीधर (गोलू) पाटील, देवेंद्र वाणी, डॉ.पवन सरोदे, दिनेश नेमाडे, किरण कोलते, प्रा.प्रशांत पाटील, राजेंद्र नाटकर, भावेश चौधरी, प्रवीण ईखणकर, राजेंद्र आवटे, भालचंद्र पाटील, आनंद ठाकरे, प्रमोद नेमाडे, शेखर इंगळे, शंकर शेळके, अलका शेळके, धनराज बोरकर, सौ.शैलेजा पाटील, शे.रेहमान शे.बाबू, अनिकेत पाटील, सुमित बर्‍हाटे, राहुल तायडे, संतोष ठोसर, तुषार चिंधळे, भास्कर पाटील, खुशाल जोशी, गौरव आवटे, वैभव लोणारी, मनीष सारंगधर पाटील, चेतन बोरोले, संजय बोचरे, संजय पाटील, सागर जाधव, यशांक पाटील, शेखर धांडे, अतुल गोसावी, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, भारती वैष्णव, पल्लवी वारके आदींची उपस्थिती होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !