शरीर सुखाला नकार देणार्‍या महिलेला उसाच्या फडात पेटवले


A woman who refused body pleasure was set on fire in a sugar cane कोल्हापूर : पतीच्या निधनानंतरर आईसोबत वास्तव्य करणार्‍या 42 वर्षीय महिलेसोबत नराधमाने शरीरसुखाची मागणी केली मात्र महिलेने नकार देताच तिचा गळा आवळून खून करण्यात आला तर घटना उघडकीस न येण्यासाठी उसाच्या फडात महिलेला नेत तिला पेटवून देण्यात आले. आजरा तालुक्यातील भादवण या गावात घडला. आशा मारूती खुळे (42) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून योगेश पांडूरंग पाटील (35, रा.भादवण) या आरोपीला अटक करण्यात आली.

खून करीत मृतदेह जाळला
आशाताई मारूती खुळे (42) ही महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आई सोबत वास्तव्यास होती. गुरुवारी संशयित आरोपी योगेश पांडूरंग पाटील (35, भादवण) याने दुपारच्या सुमारास भादवण ते भादवणवाडी रस्त्यावर सदर महिलेले गाठत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली मात्र महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तिचा गळा आवळला व उसाच्या फडात तिला टाकत पेटवून दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !