कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Chance of rain in Madhya Maharashtra including Konkan मुंबई : कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या बुधवारपासून कोकणात आणि गुरुवारपासून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकणसह राज्यातील काही भागात पाऊस
हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वार्यांची दिशा सध्या वायव्येकडे जाताना दिसत असून, ती दिवसागणिक आणखी तीव्र होत आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये या वार्यांचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन कोकण पट्ट्यासह राज्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.






महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यात पाऊस
कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे तर मध्य महाराष्ट्रातील 17 तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण 22 जिल्ह्यात 1 ते 7 जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची देखील शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे.


