भुसावळात नाहाटा चौफुलीवर मेन रायझिंगला गळती : उद्यापर्यंत होणार दुरुस्ती


Leakage in main rising on Nahata Chauphuli in Bhusawal : Repair to be done by tomorrow भुसावळ  : शहरातील दक्षिण भागाला पाणीपुरवठत्त करणार्‍या नाहाटा चौफुलीवरील मेन रायझिंगला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता. सर्व्हिस रोड खोदण्याची परवानगी मिळाल्यानंतर पालिकेने गळती शोधण्याचे कार्य शुक्रवारी सुरू केल्यानंतर रविवारी तिसर्‍या दिवशी खोदकामानंतर महामार्गाच्या डक्टमध्ये जलवाहिनीला गळती असल्याचे समोर आले. पालिकेने महामार्गाच्या उत्तरेकडून पाईप काढून जोडणीचे काम सुरू केले. सर्व्हिस रोडवर पाईप लाईनला कव्हरिंग नसल्याने या कामात सिमेंट पाईपचे कव्हरिंग करण्यात येईल. सोमवारी सायंकाळ किंवा मंगळवारी दुपारपर्यंत गळती जोडून चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तीन दिवसानंतर गळतीचा लागला शोध
पालिकेने लिकेज दुरुस्तीसाठी महामार्गाच्या दक्षिणेकडील सर्व्हिस रोड फोडला. त्यातून महामार्गाच्या डक्टमधील पाईप बाहेर काढले. डक्टच्या आतील भागात गळतीचा शोध लागल्याने आता जोडणीचे काम पालिकेने सुरू केले आहे. पुढे उत्तरेकडील भागातून पाइप जोडून ते आतील भागात ढकलून नाहाटा कॉलेज भागाकडून बाहेर निघतील, असे नियोजन आहे. या जोडणीसाठी सर्व्हिस रोड खोदताना तेथे पाईप लाईनला कव्हरिंग केले नसल्याचे आढळले.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !