रेशन दुकानदारांनी संघटीत होऊन संपात सहभागी व्हा : राजेश अंबुस्कर

वरणगावला जिल्हा आढावा बैठकीत दुकानदार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर


भुसावळ : 1 जानेवारीपासून राज्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारून आंदोलन करीत आहे. या संपात जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी आपापले दुकाने बंद ठेवून एक दिलाने संघटीतपणे संपात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश आंबुसकर यांनी सोमवार, 1 जानेवारी वरणगाव येथे झालेल्या जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या बैठकीत आवाहन केले.

यांची बैठकीला उपस्थिती
वरणगाव शेतकी संघाच्या आवारात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघ जळगाव जिल्ह्यातील सर्व दुकानदाराची आढावा बैठक 1 जानेवारी रोजी घेण्यात आली. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश आंबुसकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक भागवत पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, राज्य सदस्य महेंद्र बावस्कर, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, कैलास उपाध्याय, बाळा भालशंकर, भुसावळ तालुका अध्यक्ष महेंद्र सपकाळे, पाचोरा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सी.आर.पाटील, उल्हास भारसके तसेच चोपडा, धरणगाव, बोदवड, अमळनेर, मुक्ताईनगर, रावेर, जामनेर या तालुक्याचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती.


सर्वांनी संघटीत व्हा : राजेश आंबुस्कर
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे यांनी केले. राज्य सदस्य महेंद्र बावीस्कर, जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, सुनील पाटील यांनी दुकानदारांच्या येणार्‍या अडचणी आणि सध्या सुरू असलेला संप यावर आपली मते मांडली.
राज्य उपाध्यक्ष राजेश आंबुस्कर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दुकानदारांनी संघटीत होऊन संप काळात कोणीही आपले दुकाने उघडू नये आणि ई पॉस मशीन सुरू करू नका, कारण काही ठिकाणी संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न देखील केला जातो, असे न करता सर्वांनी संघटीत रहा, असे आवाहन राजेश अंबुसकर यांनी जिल्ह्यातील सर्व दुकानदाराना केले.

यांची बैठक यशस्वीतेसाठी परीश्रम
आढावा बैठक यशस्वीतेसाठी पी.एन.प्रधान, भगवान वंजारी, भास्कर चौधरी, सी.आर.पाटील, ईश्वर पवार, संतोष माळी, किरण पाटील, सुभाष चौधरी, धीरज तायडे, अक्षय तायडे, पंकज पाटील, यशवंत बनसोडे, नारायण वाणी, आरीफ मिर्झा, उमाकांत शर्मा, उल्हास भारसके यांच्यासह भुसावळ तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुनील अंभोरे यांनी तर आभार कैलास उपाध्यक्ष यांनी मानले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !