अवैध धंदे हद्दपार करणार : क्यूआर कोड पेट्रोलिंगवर भर : अकोल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची ग्वाही
Illegal businesses will be expelled : Emphasis on QR code patrolling : Akola Superintendent of Police Bachchan Singh’s testimony अकोला : अकोला शहरातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्यात येतील शिवाय गोवंश तस्करी, अवैध गुटखा विक्रीला प्रतिबंध घालण्यासह नागरीकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात येईल शिवाय वाशिम येथे कार्यरत असताना, क्युआर कोड पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात आला होता. अकोल्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही अकोल्याचे नूतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली. मंगळवार, 2 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता मावळते पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.
कायदा-सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य
बच्चनसिंग म्हणाले की, शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याला सर्वोच्च प्राधान्य असेल. गुन्हेगारी प्रवृत्तीवर एमपीडीए, तडीपारच्या कारवायाही सुरूच राहतील. तसेच एमइआरएस डायल 112 ही योजनाही प्रभावीपणे राबविण्यात येईल. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलिस निरीक्षक विजय नाफडे, एपीआय कैलास भगत, एपीआय महेश गावंडे, पीएसआय गोपाल जाधव आदींनी त्यांचे स्वागत केले.


