हिट अ‍ॅण्ड रन कायदा तूर्तास लागू नाही : राज्यातील संप मागे


Hit-and-run law no longer in force: State strike back मुंबई  : हिट अ‍ॅण्ड रन कायदा तूर्तास लागू न करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतल्यानंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मध्यरात्रीपासून मागे घेतला आहे. दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत होण्यास बुधवारी दिवसभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक शहरात सद्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून किमान दोन दिवसात परीस्थिती सर्वसामान्य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पहाटेपासून पंपावर लागल्या रांगा
मुंबईतअबुधवारी पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली आहे. ट्रान्सपोर्ट युनियनने जरी आपल्या संप मागे घेतला असला तरी मुंबईत काही ठिकाणी काल दिवसभर लोकांमध्ये गैरसमज पसरल्यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या दिसल्या. काही ठिकाणी साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर आज साठा आहे मात्र पहाटेपासूनच आजही मुंबईकरांनी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या. आहेत.


नागपुरातील 75 टक्के पंप कोरडे
नागपूर शहरातील 75 टक्के पेट्रोल पंप कोरडे ठाक झाले आहेत आणि बुधवारी रात्रीपर्यंत उर्वरित 25 टक्के पेट्रोल पंप ही कोरडे होण्याची भीती आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी माहिती दिली. तर दुसरीकडे प्रशासनाकडून पोलीस सुरक्षेत पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !