अल्पवयीन संशयितांनी केला तरुणाचा खून


पुणे  : खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपोडी परिसरात अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा निर्घृणपणे खून केला. भर दिवसा घडलेल्या या घटनेने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. धीरज प्रदीप भोसले (22, बोपोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पूर्व वैमनस्यातून घटना
खून केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुले पसार झाली होती. दरम्यान खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत धीरज याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल होता. तर मारेकरी दोघेही अल्पवयीन आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !