अपघातातील जखमी पुतण्याला पाहण्यासाठी जाताना काकूचा दुर्दैवी मृत्यू


Aunt tragically dies while going to see her injured nephew in an accident जळगाव : दाम्पत्य अपघातात जखमी झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवल्याने काकूचा मृत्यू झाला तर काकू जखमी झाल्या. हा अपघात शुक्रवार, 5 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ (आयटीआय) झाला.

काळाचा दुर्देवी फेरा
गुणवंत पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक असून ते पत्नी पुष्पा पाटील यांच्यासह प्रेमनगरमध्ये राहतात. त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे पती-पत्नी कोल्हे नगरमध्ये जात होते. महामार्गावर आयटीआय जवळ आलेले असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात हे दाम्पत्य खाली पडले. त्या वेळी त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मयत पुष्पा पाटील यांना एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आहे. मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !