चोपडा तालुक्यातील तरुणीवर चौघांचा अत्याचार : संशयिताना बेड्या


Chopra taluka girl assaulted by four: Suspects handcuffed चोपडा : चोपडा तालुक्यातील एका गावातील तरूणीवर चार जणांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अडावद पोलिसात गुन्हा दाखल होताच एका संशयिताला चोपडा तालुक्यातून अन्य तिघांना सुरत येथून अटक करण्यात आली.

धमकी देत केला अत्याचार
चोपडा तालुक्यातील एका गावात 18 वर्षीय पिडीता वास्तव्यास आहे. याच गावातील संशयित गफूर गबू तडवी याने 2 जानेवारी रोजी दुपारी पीडीतेच्या घरात शिरून तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यार अत्याचार केला. यानंतर संशयिताने तिला धमकी देत यावल तालुक्यातील एका गावात बोलावले व सरकारी दवाखान्यावर तिला सोडून संशयित पसार झाला व याचवेळी याच गावातील तीन नराधम तरुणांनी 4 जानेवारी रोजी रात्रभर आळीपाळीने अत्याचार केला. .



चौघा संशयितांना अटक
भांबावलेल्या पीडीतेने यानंतर अडावद पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. या प्रकरसी संशयित गफूर गबू तडवी (33), अमोल शत्रुघ्न कोळी (23), पंकज बुधा कुंभार (26) व प्रतीक राजेंद्र कोळी (20) या चौघांविरूध्द अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आहे. तपास सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !