लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या 26 अतिरीक्त फेर्‍या होणार


Lokmanya Tilak Terminus-Kanpur weekly special train will run 26 additional times भुसावळ : प्रवाशांची रेल्वे गाड्यांना होत असलेली अतिरीक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुसावळसह विभागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार आहे.

प्रवाशांना सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
एलटीटी ते कानपूर या मार्गावर या गाडीच्या 26 फेर्‍या होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी 04152 सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शनिवार, 6 जानेवारी ते 30 मार्च 2024 पर्यंत (13 फेर्‍या) दर शनिवारी ही गाडी संध्याकाळी 5.15 वाजता सुटेल आणि कानपूर सेंट्रल येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 3.45 वाजता पोहोचेल.



04151 सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी शुक्रवार, 5 जानेवारी ते 29 मार्च 2024 पर्यंत (13 फेर्‍या) दर शुक्रवारी दुपारी 3.25 वाजता कानपूर सेंट्रल येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 2.55 वाजता पोहोचेल. भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, भरवारी, सिराथू आणि फतेहपूर येथे थांबणार आहे. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, 8 वातानुकूलित तृतीय, 8 शयनयान आणि 7 जनरल द्वितीय श्रेणी 2 लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन (24 डबे) असतील. या गाडीचे आरक्षण शुक्रवार, 5 पासून सुरू करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !