चाळीसगाव शहरात 16 जानेवारीपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपूराण कथेचे आयोजन
खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून भव्यदिव्य आयोजन
Pandit Pradeep Mishra’s Mahashivpuran story organized in Chalisgaon city from January 16 चाळीसगाव : देशात व देशाबाहेर देखील आपल्या मधुर रसाळ वाणीतून शिवपुराण कथेच्या माध्यमातून तमाम भाविकांना अध्यात्माचा विलक्षण आनंद देणारे आंतरराष्ट्रीय कथाकार परमपूज्य पंडितजी मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेचा कार्यक्रम चाळीसगाव येथे मंगळवार, 16 जानेवारी ते शनिवार, 20 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी मंगळवारी येथे दिली आहे .
मालेगाव रोडवरील 40 एकरात होणार शिवकथा
चाळीसगाव येथील मालेगाव रोड स्थित सुमारे 40 एकर परीसरात मंगळवार. 16 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत प्रभू श्रीराम महा शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कथेच्या कार्यक्रमस्थळी उन्मेश पाटील विविध पदाधिकारी अधिकारी कार्यकर्त्यांसह पाहणी केली.


अधिकार्यांनी केली जागेची पाहणी
उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाविकांची उपस्थिती या महाशिवपुराण कथेला लाभणार आहे. मंगळवारी खासदार उन्मेश पाटील, अपर पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकार्यांनी या कार्यक्रमाची पाहणी करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाययोजनांची चर्चा केली..
लाखो भाविकांची असेल उपस्थिती
खासदार उन्मेश पाटील यांनी यावेळी सांगितले की, पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळणार आहे. चाळीसगाव परीसरातील मालेगाव, धुळे, पारोळा, एरंडोल ,भडगाव, पाचोरा, नांदगाव बनोटी,सोयगाव, कन्नड या परिसरातून लाखो भाविक येणार आहेत. महाशिव पुराण कथेचे निरूपण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या माध्यमातून भाविकांना श्रवण करता येणार असल्याने अधिकाधिक भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नायब तहसीलदार जितू धनराळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, आशुतोष खैरनार, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय गोयर , पालिकेचे वीज अभियंता महाले, पंढरीनाथ पवार, ज्येष्ठ नगरसेवक राजु आण्णा चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, देविदास चौधरी, उद्योजक संजय पवार, उद्योजक पद्माकर पाटील, तुषार भावसार, प्रशांत वाघ, सौरव पाटील, सारंग जाधव, अमित सुराणा, चेतन वाघ, भाऊसाहेब पाटील, रवीभाऊ चौधरी, मयूर साळुंखे, बंटी चौधरी, किशोर गुंजाळ, सचिन राठोड, पप्पू राजपूत,बाळासाहेब शिनकर, कल्पेश मालपुरे , साहेबराव काळे, सागर गुंजाळ, नरेन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.





