भुसावळात शिक्षकाकडे घरफोडी : दोन अट्टल आरोपींना अटक

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त : पाच महिन्यानंतर घरफोडीची उकल


Burglary of a teacher’s house in Bhusawal: Two accused arrested भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमीयरमागील साकेत सोसायटीत शिक्षकाकडे सुमारे पाच महिन्यांपूर्वी दोन लाखांची धाडसी घरफोडी झाली होती. बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील कुविख्यात आरोपीसह दोघांच्या मुसक्या बांधल्यानंतर घरफोडीची कबुली देत दोन लाखांचा मुद्देमाल काढून दिला आहे. शाकीर उर्फ गोलु सय्यद (26, मुस्लीम कॉलनी, उस्माने मशीद जवळ, भुसावळ) व मुस्तफा मंजूर पिंजारी (23, खडका रोड, बडी खानका, भुसावळ) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
शिक्षक महेश लोटनगीर गोसावी (41, प्लॉट 20, साकेत सोसायटी, हॉटेल प्रिमीयरच्या मागे, जामनेर रोड, भुसावळ) हे बाहेरगावी गेल्यानंतर 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते 31 ऑगस्ट 2023 रोजीच्या सायंकाळी चारदरम्यान चोरट्यांनी तक्रारदाराच्या घराचा कुलूप कडी-कोयंडा तोडून दोन लाख रुपये किंमतीचे दागिने लांबवले होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयितांबाबत खबर्‍याने गोपनीय माहिती पथकाला दिल्यानंतर संशयिताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी घरफोडीची कबुली देत दिड लाख रुपये किंमतीची व 27 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व 50 हजार रुपये किंमतीची व दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. संशयितांची पोलिस कोठडी घेतल्यानंतर त्यांची शुक्रवारी कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, शाकीर उर्फ गोलु सय्यद हा कुविख्यात आरोपी असून त्याच्याविरोधात लोहमार्गसह अन्य पोलिसात 18 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.



यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार यासीन पिंजारी, हवालदार महेश चौधरी, हवालदार समाधान पाटील, हवालदार रमण सुरळकर, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार निलेश चौधरी, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, जावेद शहा, प्रशांत परदेशी, योगेश माळी, राहुल वानखेडे, अमर अढाळे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !