भुसावळ तालुका खुनाने हादरला : वादातून तरुणाची हत्या
Bhusawal taluka rocked by murder : Youth killed due to dispute भुसावळ : मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात शनिवारी, 13 रोजी दुपारी घडला. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. भावेश अनिल भालेराव (25, भगवान साळवे नगर, फेकरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. डोक्यावर व गळ्यावर वार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस अधिकार्यांची धाव
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व कर्मचार्यांनी दुपारी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ट्रामा सेंटरला हलवण्यात आला.


