फेकरीतील तरुणाची धारदार शस्त्राने हत्या : संशयित आरोपी जाळ्यात ; खुनामागे समोर आले हे कारण !


Murder of a young man in Fekri with a sharp weapon: Suspect accused in the net; The reason behind the murder! भुसावळ : फेकरी, ता.भुसावळ येथील तरुणाची धारदार शस्त्राचे वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात शनिवारी, 13 रोजी दुपारी घडली होती. या घटनेत भावेश अनिल भालेराव (25, भगवान साळवे नगर, फेकरी) या तरुणाची हत्या करण्यात आली होती मात्र मारेकर्‍यांचे नाव अस्पष्ट होते शिवाय खुनाचे कारणही स्पष्ट झाले नव्हते.पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवघ्या काही तासात संशयित निष्पन्न केला असून त्याला कोपरगाव पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बेड्या ठोकल्या आहेत. रोशन बबन हुसळे (28, फेकरी) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

चाकूचे वार करीत केला खून : काही तासात संशयित जाळ्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, मयत भावेश भालेराव व रोशन हुसळे यांच्यात पैशांचा वाद होता व पैशांवरून भावेश सातत्याने रोशनकडे तगादा लावत होता. शनिवारी दुपारीदेखील उभयतांमध्ये वाद झाला. यावेळी चाकूचे वार करीत भावेशचा खून करण्यात आला. खुनानंतर संशयित पसार झाला. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील यांनी संशयिताला निष्पन करीत कोपरगाव येथे पळून जाण्यापूर्वीच त्यास अटक केली. अटकेतील संशयित हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सींग खेळाडू असल्याची माहिती आहे.



पोलिस अधिकार्‍यांची धाव
दरम्यान, खुन झाल्याची कळताच पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व कर्मचार्‍यांनी दुपारी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ट्रामा सेंटरला शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. जळगाव येथे मोबाईल फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम पाचारण करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !