धक्कादायक ! : पाचोरा पोलिस ठाण्यातील 12 लाखांच्या रोकडसह 102 ग्रॅम सोन्यावर पोलिसानेच मारला डल्ला


Shocking! : 102 grams of gold along with 12 lakh cash in Pachora police station was busted by the police. पाचोरा : शिस्तीचे खाते म्हणून पाहिले जाणार्‍या पोलिस दलातील कर्मचार्‍यानेच बेशिस्तपणाचे वर्णन करीत जप्त मुद्देमालावर डल्ला मारल्याचा प्रकार पाचोरा पोलिस ठाण्यात घडला आहे. पाचोरा पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कारकूनाने तब्बल 12 लाखांच्या रोकडसह सहा लाख 85 हजारांच्या ोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हवालदार यशवंत भिका घोरसे (52, रा.पाचोरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
पाचोरा पोलिस ठाण्यात यशवंत कचरू घोरसे हा कार्यरत असताना त्याच्याकडे मुद्देमाल कारकून म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. कस्टडीत असलेल्या 102.93 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6.464 किलोग्रॅम चांदीचे दागिने व 12 लाख 37 हजार 577 रुपये रक्कम घेत संशयित पसार झाला. दरम्यान, यशवंतचा भाऊ सुनील घोरसे याने या मुद्देमालापैकी 73.63 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6.464 किग्रॅ चांदीचे दागिने व 6 लाख 85 हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांना परत केला आहे. अद्यापही यशवंत याच्याकडे 29.30 ग्रॅम सोन्याचे दागिने व 5 लाख 52 हजार 577 रुपये घेणे बाकी आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या फिर्यादीवरून यशवंतविरुद्ध 13 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !