भुसावळ तालुक्यातील 54 गावांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंचनामे


भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : पावसाअभावी भुसावळ तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतीपिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे गुरुवारपासून सुरू झाले. भुसावळ तालुक्यातील 54 गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांच्या संयुक्त पथकांकडून प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन हे पंचनामे सुरू आहेत. येत्या आठवडाभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.

मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक
दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयात बैठक झाली होती. प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गावनिहाय पाहणीचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाचे मिळून 122 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, तहसीलदार यांनी हतनूर येथे प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी केली. त्यांनी विविध शेतांमध्ये फिरून पिकांची सद्यस्थिती जाणून घेत शेतकर्‍यांशी सविस्तर चर्चा केली. वस्तुस्थितीनुसार अचूक अहवाल तयार करण्यावर भर दिला जात आहे. असे सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !