किरकोळ वादातून शिरसोलीतील तरुणावर प्राणघातक हल्ला


A youth in Shirsoli was assaulted due to a minor dispute जळगाव : चारचाकी वाहनासाठी दिलेली कॅरी परत मागितल्याचा राग आल्याने दोन जणांनी शिवदास उत्तम बारी (34, रा.शिरसोली, ता.जि.जळगाव) या तरूणाला मारहाण केली. यात एकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने बारी यांचा हात फॅक्चर झाला. ही घटना शिरसोली गावातील इंदीरा नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील इंदिरा नगरात शिवदास बारी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शिवदास बारी यांनी त्यांच्या चारचाकी वाहनाची कॅरी गावातील भरत भानुदास बारी यांना वापरण्यासाठी दिली होती. ती कॅरी शिवदास बारी यांनी परत मागितली. त्याचा राग आल्याने भरत बारी याने गुरूवार, 11 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता लोखंडी रॉडने मारहाण केल्याने शिवदास बारी यांचा हात फॅक्चर झाला. या सोबतच सतीष भानुदास बारी यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शुक्रवार, 12 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवदास बारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार समाधान टहाळके करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !