जळगावच्या व्यापार्याला गुंतवणुकीत नफ्याच्या आमिषाने सहा लाखांचा गंडा
A businessman of Jalgaon was cheated of six lakhs by the lure of profit in investment जळगाव : जळगाव शहरातील टेलिफोन नगरातील व्यापार्याला रसायन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने पाच लाख 64 हजारांचा गंडा घालण्यात आला. या संदर्भात सायबर पोलिसात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
फेसबुकवरून साधला संपर्क
जळगाव सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आश्विन केशवलाल पटेल (40, रा.टेलिफोन नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. 27 नोव्हेंबर ते 10 जानेवारी दरम्यान त्यांना फेसबुकवरील व्हिक्टोरिया ओव्हेन यांनी त्यांच्याशी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधला. त्यांनी एका रसायन कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन करून आश्विन पटेल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने पाच लाख 64 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आश्विन पटेल यांनी शनिवार, 13 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यावरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहे.


