पोलिसांच्या गस्ती वाहनावर फायरींग : पाच संशयितांना अटक

अकोला एलसीबीची कामगिरी : पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही : पोलिस अधीक्षक बच्चन सिंह


Firing at a police patrol vehicle: Five suspects arrested अकोला : पोलिसांच्या गस्ती वाहनावर गोळीबार करणार्‍या पाच आरोपींच्या अकोला एलसीबीने मुसक्या आवळल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, पोलिसांवरील हल्ले कदापित सहन करणार नाही. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे वा नाही याबाबत आम्ही तपास करीत आहोत.

असे आहे नेमके प्रकरण
उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कंचनपूर-मांजरी ते हातरून परीसरात 30 डिसेंबर 2023 च्या रात्री गस्तीवर असणार्‍या पोलिसांना दोन दुचाकींवर संशयित दिसताच त्यांनी थांबण्याचा इशारा केला मात्र संशयित पसार होत असल्याने पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर त्यांच्यावर हल्लेखोरांनी फायरींग केली व अंधाराचा फायदा घेत संशयित पसार झाले होते. हल्लेखोरांची माहिती देणार्‍यास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.







पाच हल्लेखोरांना अटक
अकोला एलसीबीने अश्विन गणेश मुंडे (21), भावेश उर्फ अर्जुन रवींद्र मुंडाले (19), अविनाश भिमराव मुंडाले (26), योगेश रामराव मुंडाले (26) सर्व राहणार नखेगाव तसेच सागर ज्ञानेश्वर चौके (25, राहणार नेरधामणा) या पाच संशयितांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. दरम्यान, पत्रकार परीषदेला अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बाळापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज, एलसीबी निरीक्षक शंकर शेळके आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !