चाळीसगावात मुंबई पोलिस दलातील कर्मचार्‍याचा निर्घूण खून

क्रिकेटच्या वादातून चौकडीने केला तलवारीने हल्ला : चौघांना अटक


Brutal murder of a Mumbai police force employee in Chalisgaon चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील ओझरनजीक रविवारी सकाळी झालेल्या किक्रेट स्पर्धेतील वादानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या तरुण कर्मचार्‍याची चाळीसगाव शहरात तलवारीचे वार करीत हत्या करण्यात आली. या घटनेने चाळीसगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुभम अर्जुन आगोणे (28, चाळीसगाव) असे हत्या झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.

क्रिकेटच्या वादातून झाली हत्या
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे रविवारी सकाळी क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यावेळी एका गटासोबत शुभम आगोणे या तरुणाचा वाद झाला होता व त्यानंतर रविवारी सायंकाळी हा वाद उफाळून आल्यानंतर चौघांनी तलवारीने शुभमवर पाटणारोड रोडवरील बामोशी बााब दर्ग्याजवळ हल्ला केला. या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्यानंतर शुभम पाटणादेवी रस्त्यावर पडून होता व नागरीकांना ही माहिती कळताच त्यास चाळीसगाव शहरातील डॉ.देवरे यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.



पोलिस अधिकार्‍यांची धाव
चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील व सहकार्‍यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर चाळीसगाव शहरातील चार तरुणांना अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !