जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले दिड वर्षानंतर सरेंडर

दिड वर्षानंतर किरणकुमार बकाले पोलिस यंत्रणेपुढे सरेंडर : पोलिस वर्तुळात खळबळ


Suspended Inspector Kiran Kumar Bakale of Jalgaon Crime Branch finally arrested जळगाव : जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा सुमारे दिड वर्षांपासून अधिक काळापासून शोध सुरू असतानाही ते यंत्रणेला सापडत नव्हते. पोलिस यंत्रणेवर यामुळे टिकेची झोडही उठली होती मात्र सोमवार, 15 जानेवारी रोजी सकाळी किरणकुमार बकाले हे स्वतःहून पोलिस अधीक्षक कार्यालयात सरेंडर झाले आहेत.

पोलिस यंत्रणेचा दबाव वाढताच बकाले हजर
स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाले नसल्याने बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले हे सोमवारी पोलिसांपुढे हजर झाले.



पोलिस उपअधीक्षकांकडे जाब-जवाब
जळगाव पोलिस उपअधीक्षक संदीपकुमार गावीत यांच्याकडे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांच्यापुढे त्यांचा जवाबजवाब सुरू आहे.

का वॉण्टेड होते बकाले ?
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज टाकण्यात आला होता. परंतू तेथे देखील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात होता.

होम डिवायएसपींकडे होता तपास
या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून, तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती मात्र दरवेळी बकाले हे चकवा देण्यात यशस्वी होत होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !