पाळधीतील ठाकूरवाड्यात घरफोडी : 25 हजारांचे दागिणे लंपास
Burglary in Thakurwada in Paladhi: Jewels worth 25 thousand looted धरणगाव : धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील ठाकूर वाडा येथे बंद घरातून चोरट्यांनी 24 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
विलास विठ्ठल वाणी (67, रा.ठाकूरवाडा, पाळधी, ता.धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 13 जानेवारी सकाळी सायंकाळी सात वाजता विलास वाणी हे त्यांच्या नातेवाईकाकडे घर बंद करून बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधत बंद घर फोडून घरातून 24 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. हा प्रकार दुसर्या दिवशी रविवार, 14 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता उघउकीस आला. वाणी यांनी याप्रकरणी धरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी चार वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विठ्ठल पाटील करीत आहे.


