गँगस्टर शरद मोहोळ हत्या : रामदास मारणेसह गुंड विठ्ठल शेलारला अटक
Gangster Sharad Mohol murder : Gangster Vitthal Shelar arrested for killing Ramdas पुणे : राज्यभर गाजत असलेल्या पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई केली आहे. या हत्येतील मुख्य संशयित रामदास मारणे उर्फ वाघ्यासह गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. पनवेल पोलिसांनी पनवेलमधील एका फार्म हाऊसवर कारवाई करत आरोपी अटक केली आहे.
आतापर्यंत 13 संशयितांना अटक
शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 5 जानेवारी 2024 ला पुण्यात गुंड शरद मुळची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी मुन्ना पोळेकरला अटक केली होती मात्र नंतर हत्येमागचे खरा मास्टरमाईंड वेगळा असल्याचा संशय होता.


दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक
सोमवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली आहे. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली. श
