जामनेर पोलिस ठाण्यातून आरोपीची पोलिसांना तुरी : कर्नाटकातील आरोपीला 48 तासात अटक
Accused from Jamner Police Station to Police : Accused from Karnataka arrested within 48 hours जामनेर : जामनेर पोलिस ठाण्यात ताडी विक्रीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेला कर्नाटक राज्यातील संशयिताला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून तो पसार झाला. ही घटना 14 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा शोध सुरू असताना त्यास मंगळवारी अटक करण्यात आली. भागीनाथ अनंत्तया गुत्तेदार (28, जुना हिंगणारोड, पंढरीनाथ नगर, नेरीदिगर, ता.जामनेर, मूळ रा. आलोली का.चित्तापूर, जि.गुलबर्गा, कर्नाटक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपी भागीनाथ यास ताडी विक्रीच्या गुन्ह्यात 14 रोजी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते मात्र अटकेची कारवाई करण्यापूर्वी पोलिसांचे लक्ष चुकवून संशयित पसार झाला. हवालदार अतुल पवार यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. मंगळवारी त्याचा ठावठिकाणा कळताच त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीहवालदार अनिल चाटे करीत आहेत.


