चहार्डी येथे दोन घरे फोडली : दिड लाखांचा मुद्देमाल लांबवला
Two houses were broken into in Chahardi : goods worth half a lakh were recovered चोपडा : चोपडा तालुक्याील चहार्डी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन घरातून एक लाख 43 हजारांचा मुद्देमाल लांबवला. शहरी भागानंतर चोरट्यांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 16 रोजी मध्यरात्री ही घरफोडी झाली. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
चावदास नागो सैंदाणे (46, चहार्डी) हे नोकरदार असून चहार्डी येथे परीवारासह वास्तव्यास आहेत तर त्यांच्या शेजारी किशोर दशरथ मिस्तरी वास्तव्यास आहेत. 16 रोजी दोन्ही कुटूंबाचे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत एक लाख एक लाख 43 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे व रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास


