दुचाकी चोर जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : दुचाकी चोरी केल्याप्रकरणी राहुल गणेश महाजन (20, रा.तांबापुरा) यास जळगाव गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. आरोपीने 4 फेब्रुवारी 2020 रोजी गोविंदा वाणी (सातगाव डोंगरी,) यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच.19 ए.टी.0922) डी मार्टच्या पार्किंगमधून चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, अरुण राजपूत, रणजित जाधव, विनोद पाटील, किशोर जाधव यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.




