अट्टल दुचाकी चोरट्याच्या ताब्यातून नऊ दुचाकी जप्त
Nine two-wheelers seized from Attal two-wheeler thief पुणे : विविध नावे धारण करीत दुचाकींची चोरी करणार्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयिताकडून चोरीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या. शंकर भरत देवकुळे (रा. धाराशीव) असे आरोपीचे नाव आहे. धाराशीव, पुणे, मुंबई तसेच सोलापूर भागात वेगवेगळी नावे धारण करून आरोपी देवकुळे वास्तव्य करत होता.
यांनी केली कामगिरी
संशयिताने पुण्यातील वेगवेगळ्या भागातून नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सदर दुचाकी जप्त केल्या आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक मनोज बरूरे, संतोष मोरे, अशोक माने, मयुर भोसले, अशिष खरात, गणेश काठे, हेमंत पालांडे, महावीर वलटे, राहुल मोरे, अर्जुन कुडाळकर यांनी ही कामगिरी केली.


