श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गोपाल चैतन्यदास महाराज रवाना
Gopal Chaitanya Das Maharaj left for Shri Ram Janmabhoomi Pranpratistha ceremony फैजपूर : हिंदूस्थानासह संपूर्ण विश्वाचे लक्ष लागून असलेल्या श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व वृंदावन धाम, पाल गादीपती स्वामी गोपाल चैतन्य दासज महाराज अयोध्येला रवाना झाले आहे. प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा पूजन सोहळ्याला जाताना धार्मिक अध्यात्मिक नगरी फैजपूर येथे रामभक्त भाविकांनी त्यांचे जोरदार धार्मिक जल्लोषात श्रीरामांच्या जयघोषात पुष्पवर्षावात जंगी स्वागत केले. याप्रसंगी विद्या नगर, शिव कॉलनी, भुसावळ रोड परीसरातील भाविकांनी माल्यार्पण पुष्पगुच्छ देत तर महिलांनी औक्षण करून प्रवासाच्या राममय शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भरत महाजन, भाजप सरचिटणीस संजय सराफ, ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष अतुल महाजन, शिरीष टोके, मनोज टोके, आर.के.भोगे, पप्पू चौधरी, भूषण कापडे, केतन कापडे, सोनू टोके, राजू टोके, प्रफुल्ल नेहेते, विजय सराफ, ओम सराफ यासह शेकडो भाविक महिला उपस्थित होत्या.







