भाजपात प्रवेशाची खुली ऑफर : सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट


Open offer to join BJP : Sushilkumar Shinde’s secret blast सोलापूर  : प्रणिती शिंदे यांच्यासह आपल्याला भाजपात प्रवेश करण्याची ऑफर मिळाल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे म्हणाले की, माझा दोनदा पराभव झाला तरीही मला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपात येण्याची ऑफर आली आहे.

तर पुन्हा वैभवाचे दिवस येणार
शिंदे म्हणाले की, ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो. जिथं आमचं बालपण, तारुण्य गेले. आता 83 वर्षाचा आहे. आता दुसर्‍याच्या घरात कसं जाणार? हे शक्य नाही. प्रणितीही अशा पक्ष बदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही. राजकारणात असं होत राहते. पराभवाबाबतीत एका पंडित नेहरू म्हणाले होते, लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. त्यानंतर तो स्वत:चालतो. चालताना पडतो, पुन्हा उठतो आणि पुन्हा पडतो, उठतो मग चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही. आपल्यालाही पुन्हा वैभवाचे दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







भाजपाला पराभव दिसत असल्यानेच पक्षात वाढवले इनकमिंग : पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास नसल्याने इतर पक्षातील नेत्यांना भाजपा सोबत घेत आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे, अजित पवारांना घेतले आणि आता काँग्रेस नेत्यांना घेण्याचा प्रयत्न आहे परंतु आता भाजपाचा पराभव दिसत असताना कुणीही त्यांच्यासोबत जायला तयार नाही. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. पक्षामुळे माणसं मोठी होतात, वैयक्तिक कुणी मोठे होत नाही, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाला लगावला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !