मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले न्यायालयीन कोठडीत
व्हीसीद्वारे सुनावली न्यायालयीन कोठडी : तपासाधिकार्यांचा जामिनाबाबत मागितला खुलासा (से)
Offensive statement about Maratha community: Suspended inspector Kiran Kumar Bakale in judicial custody जळगाव : मराठा समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले हे सुमारे दिड वर्षानंतर सोमवार, 15 जानेवारी रोजी पोलिस यंत्रणेपुढे शरण आले होते. बकाले यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली व कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना बुधवारी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, बकाले यांच्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर तपासाधिकारी तथा सरकारी अभियोक्ता यांचा गुरुवारी खुलासा मागितला आहे.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वॉण्टेड होते बकाले
मराठा समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने किरणकुमार बकाले यांना निलंबित व्हावे लागले होते शिवाय विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बकाले यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल आहे.


न्यायालयात न आणता व्हीसीद्वारे साक्ष
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बकाले यांच्याविरोधात मराठा समाज प्रचंड संतप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर बकाले यांना बुधवारी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. हजर करताच न्यायालयाने बकाले यांना पोलिसांविषयी काही तक्रार आहे का? अशी विचारणा करताच बकाले यांनी ‘नाही’, असे उत्तर दिले. दरम्यान, बकाले यांना बुधवारी दुपारी न्यायालयात आणणार हे गृहित धरून मराठा समाजाच्या विविध संघटनांचे शेकडो पदाधिकारी न्यायालयात आले मात्र बकाले यांना न्यायालयात न आणता व्हीसीद्वारे सादर करण्यात आले.
बकाले यांच्या आवाजाचा नमूना तपासणीला
बकाले यांनी मराठा समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याबाबतची क्लीप समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. तपासाच्या अनुषंगाने बकाले यांच्या आवाजाचा नमूना नाशिकच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास होम डीवायएसपी संदीप गावीत करीत आहेत.
