भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये निघाली अक्षदा मंगल कलश यात्रा
Akshada Mangal Kalash Yatra started in Ward No. 24 in Bhusawal भुसावळ : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोमवार, 22 रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील नागरीकांना अक्षता वाटपाचा उपक्रम सुरू आहे. या अनुषंगाने भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील नागरीकांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी व अक्षदा वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केलेल्या समाजसेविका दीपाली वाणी-बर्हाटे यांच्या पुढाकाराने कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत प्रभागातील शेकडो महिलांसह पुरूषांचा सहभाग होता.
अक्षदा कलश यात्रेत महिलांसह नागरीकांचा सहभाग
प्रभाग क्रमांक 24 च्या समाजसेविका तथा शिंदे गटाच्या दीपाली वाणी-बर्हाटे यांच्या नेतृत्वात लक्ष्मी नगरातील हनुमान मंदिरापासून भव्य अक्षदा कलश यात्रेला सुरूवात करण्यात आली. यानिमित्त भव्य असा राम दरबार भरवण्यात आला होता. स्वामी समर्थ कॉलनी, दिगंबर नगर, श्रद्धा नगर, नाहाटा कॉलेज परीसर व गजानन महाराज मंदिर व तेथून पुन्हा लक्ष्मी नगरात कलशयात्रा पोहोचल्यानंतर तिचा समारोपकरण्यात आला.


यांचा कलश यात्रेत सहभाग
कलश यात्रेत दीपाली बर्हाटे-वाणी यांच्यासह प्रभागातील वंदना सोनार, छाया हेंडे, शुभांगी भारंबे, छाया जावळे, सपना सोनवणे, दीपाली बडगुजर, विजय बर्हाटे, सौरभ पवार, हेमंत हेंडे, गणेश महाजन, शुभांगी महाजन यांच्यासह प्रभागातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होते.





