इंधन बचत करणार्या चालकांचा सत्कार व्हावा : नाना पाटील
Drivers who save fuel should be felicitated: Nana Patil भुसावळ : एस.टी.महामंडळ जवळपास 19 हजार 800 गाड्यांद्वारे जवळपास 70 लाख प्रवाशांची वाहतूक करते. एस.टी.ला सेवा देण्यासाठी जवळपास 12 लाख 20 हजार लीटर डिझेल लागते. डिझेलचे दर वाढल्याने एस.टी.च्या खर्चात वाढ होत असून अशा स्थितीत प्रवासी सेवा देताना आर्थिक खर्चाच्या अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी इंधन बचत ही काळाची गरज असून इंधन बचत करीत करीत राष्ट्रसेवेला मदत करणार्या चालकांचा सत्कार करावा, अशी भावना भुसावळ एस.टी.डेपो समिती सदस्य तथा पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी येथे केले.
16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान मासिक इंधन बचाव मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी एस.टी.आगाराच्या कार्यशाळेत चालकांना मार्गदर्शन केले. डेपो व्यवस्थापक पी.बी.भोई, तडवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास वाहक, चालक व तांत्रिक कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन देवकर तर आभार पी.बी.भोई यांनी मानले.







