पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवा : अ‍ॅड.रवींद्र पाटील

मुक्ताईनगरात निवासी अभ्यासवर्गाचे आयोजन


Bring the policies of the party to the people : Adv.Ravindra Patil मुक्ताईनगर : पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवा शिवाय संघटन मजबूत करून जोमाने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील यांनी येथे केले. कार्यकर्त्यांची कौशल्ये अधिक विकसीत होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, विचारधारा, कार्यपद्धती याची कार्यकर्त्यांना सखोल माहिती व्हावी व कार्यकर्त्यांनी ती सामान्य जनतेपर्यंत पोहचवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर विधानसभेतर्फे मुक्ताईनगरातील गोदावरी मंगल कार्यालयात गुरुवार, 17 जानेवारीपासून दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड.रवींद्रदभैय्या बोलत होते.

यांची प्रमुख उपस्थिती
पहिल्या सत्रात महिला प्रदेश अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, आबा पाटील, किशोर पाटील, माजी सभापती विलास धायडे, मंदार पाटील, विनोद तराळ, सुधीर तराळ, प्रा.सुनील नेवे, दशरथ कांडेलकर, रंजना कांडेलकर, अनिता येवले, डॉ.काजळे, निवृत्ती पाटील, राजू माळी, विलास धायडे, प्रदीप बडगुजर, बबलू सापधरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे वैचारीक अधिष्ठान, राष्ट्रवादीचा इतिहास, विकासातील योगदान आणि कार्यपद्धती यावर प्रा.डॉ.जतीन मेढे,
सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर प्रा.डॉ.सुनील नेवे, व्यक्तिमत्व विकास, टीम वर्क, वेळेचे व्यवस्थापन यावर प्रा.सुरेश पांडे यांनी मार्गदर्शन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !