जळगाव जिल्ह्यात 11 हजार 920 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पोलीस विभागाची 2023 या वर्षात उत्कृष्ट कामगिरी : मागील दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी कारवाईत वाढ


Preventive action against 11 thousand 920 people in Jalgaon district जळगाव : समाजात शांतता प्रस्थापित करणे, कायदा – सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. हातभट्टी वरील अनधिकृत दारूविक्रीला पायबंद बसवा यासाठी दारूबंदी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पोलिस विभागाकडून उगारण्यात येतो. यासाठी पोलिस विभागाच्या वतीने जिल्ह्यात 2023 या वर्षात 11920 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना वचक बसला आहे. 2021 व 2022 या वर्षाच्या तुलनेत ही प्रतिबंधात्मक कारवाईत यावर्षी वाढ झाली आहे.

गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलिस व महसूल यंत्रणेकडून सीआरपीसी 107, 109 व 110 अन्वये तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 93 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असते.



2021 या वर्षात 8806 व 2022 या वर्षात 9083 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर या कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे .

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांची प्रतिबंधात्मक कारवाई बाबत घ्यावयाच्या दक्षता याविषयावर संयुक्त कार्यशाळा ही नुकतीच घेण्यात आली आहे. सीआरपीसी 107, 109 व 110 मध्ये पोलीस विभागाने परिपूर्ण प्रस्ताव कसे सादर करावे. कार्यकारी दंडाधिकारी यांनी पहिला बाँड कसा घ्यावा, रोजनामा कसा लिहावा, नोटीसा कशा काढाव्यात, शेवटाचा बाँड किती दिवसात काढावा. याबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

शासकीय कामात अडथळा आणून सरकारी अधिकारी – कर्मचारी व पोलिसांवर हल्ला करणार्‍या व्यक्तींवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे. निवडणूक तसेच आंदोलनाच्या काळात महसूल विभागाचे कार्यकारी दंडाधिकारी व पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल व पोलीस विभागाने समन्वय ठेवत काम करावे, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !