पूर्णाड फाटा येथे सर्कल होण्याच्या मागणीसाठी व्यापार्यांची निदर्शने
मंजूर असलेल्या उड्डाण पुलाच्या विरोधात चक्काजाम
Traders protest to demand circle at Purnad Phata मुक्ताईनगर : पूल हटाव रोजगार बचाव, पूल हटाव सर्कल बनाव, क्या मांगे मजदूर-किसान रोटी कपडा और मकान आदी विविध मागण्यांनी व घोषणांनी शुक्रवारी पूर्णाड फाटा दणाणून सोडण्यात आला. पूर्णाड फाटा येथे होऊ घातलेल्या उड्डाण पुलाच्या निषेधार्थ तसेच येथे सर्कल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पूर्णाड फाट्यावरील व्यावसायीकांनी व परीसरातील नागरीकांनी एकत्र येऊन चक्का जाम करून रास्ता रोको आंदोलन केले.
उड्डाणापुलाची आवश्यकता नाही
पूर्णाड फाटा हा तालुक्यातील सर्वात जास्त रोजगार देणारा असून रोजगार वाचायला व वाढण्यासाठी आंदोलन करण्यात आले. येथे 90 ते 100 छोटे मोठे व्यावसायीक व्यवसाय करतात व या उद्योगांव 500 ते 600 व्यावसायीक पोट भरतात. इथे उड्डाण पूल झाला तर ह्या सर्वांची रोजी रोटी जाऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. येथे सर्कल केले तर अजून उद्योग-धंदे वाढून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व हजारो लोक येथे पोटाची खळगी भागवू शकणार आहेत. कुठलेच गाव किंवा रहिवासी वस्ती नाही तरी क्रॉसिंगला अवजड वाहतूक नाही त्यामुळे ह्या फाट्यावर उड्डाण पूल करण्याची गरज नाही.


पोलिस व तहसील प्रशासनाला निवेदन
पूर्णाड फाटा येथे सर्कल झाले तर पूर्णाड फाट्याची केळीची ओळख अजून वृद्धिगंत होऊन केळी व्यापाराला व व्यवसायाला चालना मिळणार आहे. यासाठी मुक्ताईनगर तहसीलदार, आमदार चंद्रकांत पाटील, पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनप्रसंगी यांची उपस्थिती
आंदोलनप्रसंगी अॅड.पवनराजे पाटील, विनोद तराळ, चंद्रकांत भोलाणे, बाळू पाटील, प्रदीप सपकाळे, नाना भोलाणे, जावेद शाह, नारायण भाऊ, राजू जावरे, जितू पाटील, गणेश पाटील, अभय देशमुख, रीतेश पाटील, किरण पाटील, विकास धनगर यांच्यासह पूर्णाड फाटा येथील व्यापारी उपस्थित होते.





